YIC Pune

be fit be healty be natural

Yoga State Level Competition -Maharshi Patanjali Purskar

Jan 052018

undefined

"योग सोसायटी, महाराष्ट्र” आयोजित राज्यस्तरीय खुली योग स्पर्धा - २०१८"

"योग सोसायटी महाराष्ट्र " ने प्रथमच राज्य पातळीवर योग प्रेमी व्यक्ती आणि संस्थांसाठी खुली योग स्पर्धा आयोजित केली आहे.

"महर्षि पतंजलि राज्य स्तरीय योग पुरस्कार "Maharshi Patanjali State Level Yoga Competition.
परमपुज्य स्वामी रामदेवजी महाराज Swami Ramdev ,Patanjali Yoga Peeth यांचे मार्गदर्शनाखाली "योग सोसायटी महाराष्ट्र " ही सेवाभावी संस्था महाराष्ट्रातील काही योग प्रेमी व्यक्तींनी श्री रामकुमार राठी Mr Ramkumar Rathi यांच्या नेतृत्वात एकत्र येऊन सुरु केली असुन, संस्थेचे प्राथमिक उद्दीष्ट भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली अनुपम देणगी "योग" सर्व समाजा पर्यंत पोहचविणे आणि समाजातील योग प्रचार प्रसार करणाऱ्या अनेक ज्ञात अज्ञात व्यक्ती आणि संस्थांना एकत्रित करून योग विद्द्येचा प्रचार आणि प्रसार अधिक वेगाने करून आधुनिक मानव समाजाला रोगमुक्त, नशामुक्त करून सुदृढ आणि समर्थ बनविण्यासाठी परस्पर सहकार्याने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राचीन भारतीय योग विद्या पुनर्प्रतिष्ठापित करण्यासाठी साहाय्य करणे आणि युवकांना योगाकडे आकर्षित करून त्यांना योगातही करियर Career in Yoga करण्यासाठी प्रवृत्त करणे असा आहे.

 


• स्पर्धा स्त्री व पुरुष अशा 2 गटात व वयोमाना नुसार 3 गटात होणार आहेत वयोमानानुसार 10 ते 15 वर्षे, 16 ते 25 आणि 26 वर्षांपासून पुढील असे 3 गट स्त्री व पुरुष गटात असतील.


• स्पर्धा त्रि स्तरीय होणार असून


१. जिल्हा स्तरीय स्पर्धा दि 21 ते 28 जानेवारी 2018 या काळात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयात संपन्न होतील.

२. विभाग स्तरीय स्पर्धा : महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांचे मिळून एकूण 8 विभाग तयार केले असून जिल्हा स्तरीय स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिले 3 विजेते विभागीय स्पर्धे साठी पात्र समजले जातील आणि विभाग स्तरीय स्पर्धा 25 फेब्रुवारी 2018 ते रविवार 4 मार्च 2018 रोजी विभाग मुख्यालयात संपन्न होणार आहेत.


३. अंतिम स्पर्धा : राज्य स्तरीय अंतिम स्पर्धा रविवार दि 11 मार्च 2018 रोजी पुणे येथे संपन्न होईल.
स्पर्धे साठी राष्ट्रीय - आंतर राष्ट्रीय स्तरावरील योग तज्ञ / खेळाडूंचे परीक्षक मंडळ नियुक्त केले असून त्यांच्या मार्गदर्शन आणि देखरेखी नुसार स्पर्धा संपन्न होतील. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यात स्पर्धेच्या आयोजन व नियोजनासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्यामध्ये स्थानिक पातळीवर योग प्रचार प्रसार करणाऱ्या संस्था आणि तज्ञ व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. 

सदर स्पर्धा आपल्या जिल्ह्यात जिल्हा स्तरावर आयोजित करायच्या आहेत. सदर स्पर्धेची नियमावली व अन्य माहिती आपल्यासाठी खालील प्रमाणे पाठवत आहे.
१. स्पर्धा स्त्री व पुरुष अश्या २ प्राथमिक गटात होईल. तसेच वयोमानानुसार वयोगट खालील प्रमाणे असतील.
२. स्पर्धेचा अभ्यासक्रम वयोगटानुसार खालील प्रमाणे राहील.
अ ) वय वर्षे १० ते १५ ( जन्म १ जानेवारी २००३ ते ३१ डिसेंबर २००७ दरम्यान झालेला असावा).
वृक्षासन
पश्चिमोत्तानासन
व्दिपाद शलभासन
बकासन
सर्वांगासन
कोणतेही १ ऐच्छिक आसन
राज्य पातळीवरील अंतिम स्पर्धेत तोंडी परीक्षा एकुण ४ प्रश्न

ब ) वय वर्षे १६ ते २५ वर्षे ( जन्म १ जानेवारी १९९३ ते ३१ डिसेंबर २००२ दरम्यान झालेला असावा)
पादहस्तासन
अर्ध मच्छिन्द्रासन
धनुरासन
बकासन
हलासन
कोणतेही १ ऐच्छिक आसन
राज्य पातळीवरील अंतिम स्पर्धेत तोंडी परीक्षा एकुण ४ प्रश्न

क) वय वर्षे २६ आणि अधिक ( जन्म १ जानेवारी १९९३ पूर्वी झालेला असावा).
त्रिकोणासन
उष्ट्रासन
पादवृत्तासन
सर्वांगासन
धनुरासन
कोणतेही १ ऐच्छिक आसन
राज्य पातळीवरील अंतिम स्पर्धेत तोंडी परीक्षा एकुण ४ प्रश्न

undefined

 

नियमावली


१. प्रत्येक योग स्पर्धकांस त्याच्या वयोगटातील दिलेली ५ आसने योग्य पद्धतीने सादर करणे अनिवार्य आहे.

२. वयोगटा प्रमाणे अभ्यासक्रमातील ५ आसने सोडून १ ऐच्छिक आसन करणे अनिवार्य आहे.

३. स्पर्धेतील आसनांचे प्रशिक्षण हे चित्रावलीतील आसनांप्रमाणेच असावे.

(चित्रातील आसने हिच आदर्श स्थिती समजली / मानली जाईल.).
प्रत्येक आसन जिल्हा स्तरीय स्पर्धेत ३० सेकंद आणि विभागीय स्पर्धा व अंतिम स्पर्धेत १ मिनिट स्थिर ठेवणे अनिवार्य आहे.

४. प्रत्येक स्पर्धकाने स्वत:ची सतरंजी / योग मॅट आणावी.

५. योगासने करण्या योग्य पोषाख प्रत्येक स्पर्धकाने परिधान करावा.


६. स्पर्धेच्या वेळी अंतिम निर्णय हा स्पर्धा तांत्रिक अधिकारी आणि आयोजकांचा राहील.

७. प्रत्येक स्पर्धकाने स्पर्धेला येताना
जन्मतारखेचा दाखला , बोनाफाईड सर्टिफिकेटची मुद्रांकित (attested) छायाप्रत (xerox) तसेच २ पासपोर्ट साईज फोटो आणावेत.

८. खालील प्रमाणे स्पर्धा सुरु होण्यापुर्वी जमा करावे.
अ) जिल्हा स्तरीय रु. १००/- प्रत्येकी
ब) विभाग स्तरीय रु. २००/- प्रत्येकी
क ) राज्य स्तरीय रु. ३००/- प्रत्येकी

९. योग पटू, शिक्षक व पालक किंवा सर्व संबंधित यांना स्पर्धेचे नियम बंधनकारक राहतील. स्पर्धेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास स्पर्धकास / संघास स्पर्धेतून वगळण्यात येईल.

१०. स्पर्धक त्यांच्या स्पर्धेच्या वेळे पूर्वी किमान १० मिनिटे चेस्ट नंबर सह उपस्थित राहणे आवश्यक आहे, अन्यथा स्पर्धकाची पुन्हा स्पर्धा घेतली जाणार नाही.

११. स्पर्धेच्या ठिकाणी गैरवर्तन, वादविवाद आढळून आल्यास त्या व्यक्तीस / संघास बॅड केले जाईल व आयोजकांचा आणि परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

१२. स्पर्धेच्या ठिकाणी दुखापत, ईजा, अपघात अथवा तत्सम दुर्दैवी घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी स्पर्धकाची राहील, याबाबत आयोजक जबाबदार राहणार नाहीत.
१३. ऐन वेळी कोणास ही प्रवेश दिला जाणार नाही. (फक्त पुणे जिल्ह्यासाठी १८ जानेवारी २०१८ नंतर कोणासही प्रवेश दिला जाणार नाही)

१४. स्पर्धे साठी राष्ट्रीय - आंतर राष्ट्रीय स्तरावरील योग तज्ञ / खेळाडूंचे परीक्षक मंडळ नियुक्त केले असून त्यांच्या मार्गदर्शन आणि देखरेखी नुसार स्पर्धा संपन्न होतील. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यात स्पर्धेच्या आयोजन व नियोजनासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्यामध्ये स्थानिक पातळीवर योग प्रचार प्रसार करणाऱ्या संस्था आणि तज्ञ व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.

विजेत्यांचे स्वरूप स्पर्धानिहाय खालील प्रमाणे राहील.
अ) जिल्हा स्तरीय - प्रथम ३ क्रमांक - प्रत्येक गटात
ब) विभागस्तरीय - पहिले २ क्रमांक - प्रत्येक गटात
क) राज्य स्तरीय - पहिले २ क्रमांक - प्रत्येक गटात

एखादा विजेता स्पर्धक पुढील स्पर्धेत भाग घेणार नसेल तर त्या परिस्थितीत त्या गाठली पुढील विजेत्या स्पर्धकास संधी देण्यात येईल.

स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना सहभागिता (participation) सर्टिफिकेट देण्यात येणार असून

जिल्हा पातळीवरील प्रथम ३ विजेत्यांना मेडल, प्रमाणपत्र व

विभागीय पातळीवरील प्रथम २ विजेत्यांना प्रमाणपत्र, व मेडल देण्यात येतील.


अंतिम फेरीतील सर्व गटातील पहिल्या 2 विजेत्यांना

"महर्षि पतंजलि राज्य स्तरीय योग पुरस्कार " प्रथमपुरस्कार रुपये51000/= रोख, मानचिन्ह (Momento) आणि प्रमाणपत्र (Certificate)

तर व्दितीय क्रमांकासाठी "महर्षि पतंजलि राज्य स्तरीय योग पुरस्कार" रुपये21000/=रोख, मानचिन्ह (Momento)
आणि प्रमाणपत्र (Certificate)

असा पुरस्कार योगऋषी स्वामी रामदेवजी महाराज Swami Ramdevji यांचे हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

undefined

 

 

या स्पर्धेच्या समन्वयासाठी पुण्यात श्री रामकुमार राठी जी यांच्या नेतृत्वात डॉ सुनंदा राठी, Dr Sunanda Rathi श्री बापू पाडळकर, श्री जगदीश दिवेकर, श्री वसंत पाटील यांची समन्वय समिती कार्यरत आहे.
स्पर्धकांनी डॉ. सुनंदा राठी, Dr Sunanda Rathi,Chiranjiv Foundation,Yoga Initiative Center.www.yicpune.com

undefined

 

 

There are no published comments.

New comment

Atom

Practicing yoga daily is solution for wellness